नटसम्राट डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo)

Dr. Shreeram Lagoo is an Indian film and theatre actor, both in Hindi and Marathi, where he was most known for his character roles in films. या ज्येष्ठ अभिनेत्याचे जीवन विषयक भाष्य,तर्कशुद्ध विचार आणि सामाजिक भान आपल्याला स्तिमित करते,विचार प्रवृत्त करते. आंधळ्यांची शाळा,आधे-अधुरे,काचेचा चंद्र,गिधाडे,नटसम्राट अशा असंख्य नाटकातून त्यांनी अजरामर भूमिका केल्या,अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शनही केले. सामना, सिंहासन,पिंजरा,घरोंदा,इन्कार सारख्या चित्रपटातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवला.भेदक नजर, शांत पण काळजाच्या आरपार जाणारा आवाज, मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट म्हणजेच डॉ. श्रीराम लागू.  डॉ. लागूयांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 या दिवशी सातारा येथे झाला. त्यांचे वडील बाळकष्ण लागू है देख्वील डॉक्टर होते. डॉ. लागूयांचे शिक्षण पुप्यात भावे हायस्कूलमध्ये,तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात पाच वर्ष कामही केलं. त्यानंतर ते कॅनडा आणि इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी गेले.1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु होता. त्यानंतर 1969 मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून पूर्णपणे नाटकात काम करण्यास सुरुवात केली. पुण्यातील पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनही केलं.वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये, मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’ या सिनेमातील लागूंच्या अभिनयानं तर त्यांना घराघरात नेलं. ‘पिंजरा’ सिनेमातील त्यांच्या अभिनयाने ते यशाच्या शिखरावर पोहोचले. ‘पिंजरा’ व्यतिरिक्त त्यांचे ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ हे सिनेमेही चांगलेच गाजले. अभिनयाशिवाय डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. श्रीराम लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. अभिनयासोबतच लागू यांनी अनेक पुस्तकंही लिहीली. त्यात झाकोळ, रूपवेध, लमाण या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी वेळोवेळी तत्कालीन सामाजिक राजकीय विषयांवर लेखही लिहिले. लागू यांनी नेहमीच आपली स्पष्ट भूमिका जाहीरपणे मांडली. ते विज्ञानवादी विचारसरणीचे होते. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीतही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी अनेक अंधश्रद्धांवर घाव घालत प्रबोधनाचं काम केलं. बुवाबाजीमुळे देवाचं बाजारीकरण झाल्याचंही त्यांनी वेळोवेळी सांगितलं. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हेच खरे समाजाचे शत्रू असल्याचं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. त्यातूनच त्यांनी देव या संकल्पनेबाबत स्पष्ट भूमिका घेत ‘देवाला रिटायर करा’ नावाचा लेखही लिहिला.

Dr. Shreeram Lagoo has acted in over 100 Hindi and Marathi films, over 40 Marathi, Hindi and Gujarathi plays, and has directed over 20 Marathi plays. He is considered one of the greatest actors of Marathi stage during the second half of twentieth century. He has also been very vocal and active in furthering progressive and rational social causes, for example in 1999, he and social activist G P Pradhan be undertook a fast in support of anti-corruption crusader Anna Hazare. He won the 1978 Filmfare Best Supporting Actor Award for Hindi film Gharaonda.

Early life and education

He was born on 16 November 1927 at Satara district, in Maharashtra state of India to Dr. Balakrishna Chintaman and Mrs. Satyabhama Lagoo, the eldest of four children. He attended Bhave High School, Fergusson College (University of Pune), and B.J. Medical College in Pune (Poona), India.

Career

He started acting in plays while attending Medical School. Once bitten by the theater bug, he continued his dramatic activity through the anvant garde group "Progressive Dramatic Association" which he started with like-minded senior friends like Bhalaba Kelkar. Meanwhile he trained as an ENT surgeon in Mumbai in the early fifties and practiced in Pune for 6 years before going to Canada and England for additional training.

He practiced medicine in Pune, India and Tabora, Tanzania in the sixties but his theater activity through Progressive Dramatic Association in Pune and "Rangaayan" in Mumbai continued when he was in India. Finally, in 1969 he became a full time actor on Marathi stage, debuting in the play "Ithe Oshalala Mrityu" written by Vasant Kanetkar.

He was the first protagonist of the famous Marathi play Natasamrat written by Kusumagraj (Vishnu Vaman Shirwadkar) and is best remembered for that role.

His wife, Deepa Lagoo is also a noted theatre, television and film actress.

Filmography

  • Pinjra (1972)
  • Samna (1974)
  • Mere Saath Chal (1974)
  • Ponga Pandit (1975)
  • Chalte Chalte (1976)
  • Barood (1976)
  • Aaj Ka Ye Ghar (1976)
  • Hera Pheri (1976)
  • Aaj Ka Ye Ghar (1976)
  • Bullet (1976)
  • Shankar Hussain (1977)
  • Kinara (1977)
  • Inkaar (1977)
  • Gharaonda (The Nest) (1977)
  • Agar (1977)
  • Immaan Dharam (1977)
  • Kitaab (1977)
  • Shalimar (1978)
  • Phool Khile Hain Gulshan Gulshan (1978)
  • Mera Rakshak (1978)
  • Devata (1978)
  • Des Pardes (1978)
  • Arvind Desai Ki Ajeeb Dastaan (1978)
  • Naya Daur (1978)
  • Damaad (1978)
  • College Girl (1978)
  • Muqaddar Ka Sikandar (1978)
  • Saajan Bina Suhagan (1978)
  • Muqabla (1979)
  • Magroor (1979)
  • Dooriyaan (1979)
  • Sargam (1979)
  • Jurmana (1979)
  • Manzil (1979)
  • Meera (1979)
  • Tarana (1979)
  • Hum Tere Ashiq Hain (1979)
  • Ladke Baap Se Badke (1979)
  • Swayamvar (1980)
  • Nishana (1980)
  • Kasturi (1980)
  • Bin Maa Ke Bachche (1980)
  • Do Aur Do Paanch (1980)
  • Lootmaar (1980)
  • Thodisi Bewafaii (1980)
  • Jyoti Bane Jwala (1980)
  • Zaakol (1980)
  • Neeyat (1980)
  • Gehrayee (1980)

    Awards and recognitions

  • In 1978, Lagoo won the Filmfare Best Supporting Actor Award for his work in Gharaonda.
  • 1997: Kalidas Samman
  • In April 2006, he was awarded the Master Dinanath Mangeshkar Smruti Pratisthan for his contribution to cinema and theater.
  • 2007: ‘Punyabhushan’ Puraskar.

    ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाने त्यांना ओळख दिली.

    इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, हिमालयाची सावली, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र अशा नाटकांतून डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘जगन्नाथाचा रथ’, ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र, ‘आधे अधुरे’, ‘गाबरे’, ‘कन्यादान’, ‘सुंदर मी होणार’ आणि ‘मित्र’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. मकरंद साठे यांनी लिहिलेले ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे त्यांचे रंगभूमीवरचे अखेरचे नाटक ठरले.पिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता या चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ पिंजरा’ या चित्रपटाद्वारे त्यांचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले. एका आदर्श मास्तराच्या आयुष्याचा तमाशा कलावंतीणीमुळे होणारा प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे रेखाटला होता. ‘सिंहासन’, ‘सामना’ आणि ‘मुक्ता’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.मराठीप्रमाणेच डॉ. लागू यांनी हिंदूी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘इन्कार’, ‘घरोंदा’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसह विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांचा ठसा उमटविला होता. ‘अनकही’ या चित्रपटातील त्यांच्या  भूमिकेला समीक्षकांनी वाखाणले होते.
डॉ. श्रीराम लागू: मराठी चित्रपट

No comments: