आधार तू जीवनी | Aadhar Tu Jeevani

सोनफूल तू, रानवेल मी, सोड हा अविचार तू
आधार तू, जीवनी आधार तू !

कोठली मी? तू कुणाचा? योग आला दो जिवांचा
शून्य माझ्या अंतरीचा उजळला अंधार तू !

चांदण्याचा हा फुलोरा, रोमरोमी ये शहारा
दिवसरात्री उधळला रे आगळा शृंगार तू

तू विसावा प्राणनाथा, प्रीतीचा सौभाग्यदाता
सोनियाच्या पाउलांनी दिपविला संसार तू


गीत–जगदीश खेबूडकर
संगीत–प्रभाकर जोग
स्वर–आशा भोसले
चित्रपट–चुडा तुझा सावित्रीचा
गीत प्रकार–चित्रगीत

No comments: