आई कुणा म्हणू मी | Aai Kuna Mhanu Mi

आई कुणा म्हणू मी तुजवीण सांग आई?
इतुकेच सांगण्याला येशील का ग आई?

तोडीत ना फुलाला वेली स्वये कधीही
सोडून तू मुलाला गेलीस का ग आई?

रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही
बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई?

चुकतो असेन मी गे म्हणतो तुला मी आई
चुकलीस तू परि का होऊन माझी आई?


गीत–पी. सावळाराम
संगीत–वसंत प्रभू
स्वर–आशा भोसले
चित्रपट–पुत्र व्हावा ऐसा
गीत प्रकार–आई, चित्रगीत

No comments: