अभिनेता जितेंद्र जोशी निर्माता बनला

 मुंबई - 22 सप्टेंबर, 2020


लोकप्रिय मराठी अभिनेता जितेंद्र जोशी आगामी ‘गोदावरी’ या चित्रपटाचा  निर्माता बनले आहेत. त्याने इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करून सांगितले कि 

"2 डिसेंबर 1997 रोजी काही स्वप्नं घेऊन मी मुंबई मध्ये दाखल झालो. गेल्या 23 वर्षात मला या शहराने आणि इथल्या माणसांनी भरभरून प्रेम दिलं . शहाणं केलं . आज एक पाऊल पुढे टाकत मी माझ्या मित्रांसोबत आमचा पहिला चित्रपट निर्माण करायचं धाडस करतोय.तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू देत."

No comments: