शैक्षणिक संस्थांच्या कारभारावर भाष्य करणारा ‘ब्लॅकबोर्ड’
शिक्षण म्हणजे स्पर्धा, शिक्षण म्हणजे तणाव... एकंदर हल्लीचं शिक्षण म्हटलं तर फक्त बाजार...याचं बाजाराचं चित्रीकरण म्हणजे ऋतूराज मोशन पिक्चर्स निर्मित ‘ब्लॅकबोर्ड’.
Blackboard (2015) ब्लॅकबोर्ड
Director: Dinesh Deolekar
A bold statement about the corrupt education system, the story of Blackboard traces a common man`s struggle to educate his granddaughter. Focused heavily on the commercialization of the archaic education system, the movie explores the hardships faced by the parents to educate their child in a world where education has turned into a business.
आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी झटणाऱ्या पालकांचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे शैक्षणिक संस्थेच्या भोंगळ कारभाराविरोधात लढणाऱ्या पालकाची भूमिका साकारत आहेत. तर शिक्षणाचा बाजार केलेल्या शिक्षण व्यवस्थेचं प्रतिनिधित्व माधवी जुवेकर यांनी केले आहे. अभिनय क्षेत्रातल्या या दोन धुरंधरांची जुगलबंदी ब्लॅकबोर्डच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळते.मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बालकलाकार मृण्मयी सुपल ‘ब्लॅकबोर्ड’ च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली चित्रा म्हणजेचं सायली देवधर आपल्याला शैक्षणिक मूल्य जपणाऱ्या शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सुनिल होळकर, वृषाली हटाळकर, राजेश भोसले, गौरी नवलकर, चार्ल्स गोम्स आणि इतर कलावंत ही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.दिनेश देवळेकर लिखित दिग्दर्शित ब्लॅकबोर्ड सिनेमाचे छायाचित्रदिग्दर्शन जावेद अहताशम यांनी केले असून संकलन सनिल कोकाटे यांनी केल आहे. तर चित्रपटातील गाणी संदिप पाटील यांनी संगीतबद्ध केली आहेत. आजपासून (जून 19, 2015) ‘ब्लॅकबोर्ड’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
No comments:
Post a Comment