आभाळीचा चांद माझ्या | Aabhalicha Chand Majhya

आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात
पंढरीचा राया दळी जनीच्या घरात

किती करी काम देवा घेई रे विसावा, देवा
हेच ऐक एवढे रे मान किती घ्यावा
घन:श्याम विठ्ठला रे पंढरीच्या नाथा, देवा
धावुनिया भक्तांपाठी वृथा शीण वाया
जरा थांबु दे रे देवा कोमल हे हात तुझे
पंढरीचा राया दळी जनीच्या घरात

किती माझ्यासंगे गाउनिया गाणी, देवा
भागलासी आता तू रे चक्रपाणी
कटी पीतांबर शोभे गळा वैजयंतीमाळा
असा हरि गरिबाच्या झोपडीत झोपी गेला
सावळीच गोजिरी ही मूर्ति सदा नयनांत
पंढरीचा राया दळी जनीच्या घरात


गीतमाणिक वर्मा
गीत प्रकारविठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत

No comments: