युगायुगांचे नाते अपुले | Yuga Yuganche Nate Apule

युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा !
सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा !

भासे सारे सुने तुझ्याविण, तुझ्याचसाठी आसुसले मन
तोडून बेड्या सर्व जगाच्या कधी आपुले होईल मीलन
ऊन-सावल्या झेलत हासत जन्म सरावा !

जो तो आहे ज्याचा त्याचा परके झाले सारे जिवलग
देह दोन परि एकच आत्मा कुणा कळावी आपुली तगमग
एकच आशा शेवटचा दिस गोड करावा !


गीत–जयश्री शिवराम, रूपकुमार राठोड
चित्रपट–तू तिथं मी
गीत प्रकार–चित्रगीत, युगुलगीत

No comments: