झर झर धार झरे | Zar Zar Dhar Zare

झर झर झर झर धार झरे

धार सुधेची कामधेनूची
भर भर भर भर कलश भरे.

नंदनवनसम गमते गोकुळ
शांतिसौख्यमय जीवन मंगल
वैभव धन हे अमोल येथिल
धेनु, गोजिरी वासरे.

हरीची मुरली वाजे मंजुळ
प्रमुदित करिते गोकुळ सारे.


गीतशांता आपटे
चित्रपटगोपालकृष्ण
गीत प्रकारचित्रगीत

No comments: