या उदास कवितेवरती | Ya Udas Kavite Varati

या उदास कवितेवरती बघ श्वास तरंगत होता
मग दिशा कुसुंबी झाल्या अन्‌ प्राण कलंडत होता

हलकेच उडाली धूळ, शपथेला रंगही हळवा
मी वळून पाहिले तेव्हा नुसताच लहरला मरवा
या निळसर वातावरणी तो नुसता स्फुंदत होता

हे रान गर्द भवताली, डोहात सावल्या जमल्या
गावात नव्या दु:खाच्या, स्वप्‍नात कशाला रमल्या
वार्‍यावर सोडुनी वचने सहवास भणंगत होता

हा नुसता कागद कोरा, तू नजर टाकुनी जा ना
क्षितिजावर उमटे तारा तो तुझाच एक बहाणा
माझ्याच मनाच्या पदरी हलकेच विहंगत होता


गीतअरुण दाते
गीत प्रकारभावगीत

No comments: