ये अबोली लाज गाली | Ye Aboli Laj Gali

ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा
ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा

मी दिले काही तुला ग
मीही राजा घेतले
ये कळी पहिली सुखाला
गुपित सांगे आतले
स्वप्‍न अधरी, स्वप्‍न पदरी, भाव रूजला कोवळा

पाकळीच्या पावलांच्या गंधगहिर्‍या चाहुली
स्वप्‍न ये हातात माझ्या होउनीया बाहुली
बाहुलीला जोजवीता गीत येते या गळा

जे हवे ते सर्व लाभे
काय मागू मी दुजे?
चित्र भावी जीवनाचे
बिंब हे माझेतुझे
लागला सार्‍या घराला हा असा याचा लळा


गीतअनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
चित्रपटहेच माझे माहेर
गीत प्रकारचित्रगीत, युगुलगीत

No comments: