आधी बीज एकलें | Aadhi Beej Ekale

आधी बीज एकलें
बीज अंकुरलें रोप वाढलें

एका बीजापोटीं, तरू कोटी
कोटी जन्म घेती सुमनें-फलें

व्यापुनि जगता तूंहि अनंता
बहुविध रूपें घेसी, घेसी
परि अंती ब्रह्म एकलें


गीत–शांताराम आठवले
संगीत–केशवराव भोळे
स्वर–विष्णुपंत पागनीस
चित्रपट–संत तुकाराम
गीत प्रकार–भक्तीगीत, चित्रगीत
  टीप –
• ‘शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं’ या संत तुकारामांच्या रचनेने स्फूर्ती घेऊन शांताराम आठवले यांनी हे गीत लिहिले.

No comments: