येशिल कधी परतून | Yeshil Kadhi Paratun

येशिल कधी परतून?
जिवलगा, येशिल कधी परतून?

वाट पाहू किती? कुठे दिसे ना, तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन
जिवलगा, येशिल कधी परतून?

हिरवे सोने हे दसर्‍याचे हाति जाई सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला? गेले बाई भिऊन
जिवलगा, येशिल कधी परतून?

भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये, भाऊराया, जाऊ नको विसरून !
जिवलगा, येशिल कधी परतून?


गीत–आशा भोसले, लता मंगेशकर
चित्रपट–अंतरीचा दिवा
गीत प्रकार–चित्रगीत

No comments: