योगी पावन मनाचा | Yogi Pavan Manacha

योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनांचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही ।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्दशस्‍त्रे झाले क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्व पट ब्रह्म दोरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


गीत–प्रसाद सावकार
नाटक–गीता गाती ज्ञानेश्वर
गीत प्रकार–नमन नटवरा, संतवाणी, मना तुझे मनोगत

No comments: