आधी बीज एकलें
बीज अंकुरलें रोप वाढलें
बीज अंकुरलें रोप वाढलें
एका बीजापोटीं, तरू कोटी
कोटी जन्म घेती सुमनें-फलें
व्यापुनि जगता तूंहि अनंता
बहुविध रूपें घेसी, घेसी
परि अंती ब्रह्म एकलें
गीत | – | शांताराम आठवले |
संगीत | – | केशवराव भोळे |
स्वर | – | विष्णुपंत पागनीस |
चित्रपट | – | संत तुकाराम |
गीत प्रकार | – | भक्तीगीत, चित्रगीत |
टीप – • ‘शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं’ या संत तुकारामांच्या रचनेने स्फूर्ती घेऊन शांताराम आठवले यांनी हे गीत लिहिले. |
No comments:
Post a Comment