आई होऊन चुकले का मी | Aai Houn Chukale Ka Mi

आई होऊन चुकले का मी?
पोर पोटची देत न ओळख, आईपणाला मुकले का मी?

नऊ मासाचा, पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला
पदराआडून अमृत पान्हा या मायेने जिला पाजिला
तळहाताच्या फोडापरी हो या लेकीला जपले का मी?

पती विरहाचे दु:ख विसरूनि शोधित आले तुजला पोरी
‘आई’ म्हण तू या आईला, सांगायाची झाली चोरी
अभागिनीचे सुख हे इवले तुलाही देवा खुपले का?


गीतपी. सावळाराम
संगीतविश्वनाथ मोरे
स्वरआशा भोसले
चित्रपटमाय माउली
गीत प्रकारचित्रगीत

No comments: