आज गोकुळात रंग खेळतो | Aaj Gokulat Rang

आज गोकुळात रंग खेळतो हरी;
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी !

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी !

सांग श्यामसुंदरास काय जाहले?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले !
एकटीच वाचशील काय तू तरी !

त्या तिथे अनंगरंगरास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिर्‍यांत वाजला
हाय ! वाजली फिरून तीच बासरी !


गीतसुरेश भट
संगीतपं. हृदयनाथ मंगेशकर
स्वरलता मंगेशकर
गीत प्रकारहे श्यामसुंदर, भावगीत

No comments: