विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी | Vitthal Vitthal Gajari

विठ्ठल विठ्ठल गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥

हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥


गीत–गंगाधर लोंढे
गीत प्रकार–संतवाणी, विठ्ठल विठ्ठल

No comments: