वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे ।
वेणुनादें गोवर्धनु गाजे ॥१॥
वेणुनादें गोवर्धनु गाजे ॥१॥
पुच्छ पसरूनि मयूर विराजे ।
मज पाहतां भासती यादवराजे ॥२॥
तृणचारा चरूं विसरली ।
गाईव्याघ्र एके ठायीं जालीं ।
पक्षीकुळें निवांत राहिलीं ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥
ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती ।
वांकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानीं बैसोनि स्तुती गाती ।
भानुदासा फावली प्रेम-भक्ति ॥४॥
गीत | – | अजितकुमार कडकडे |
गीत प्रकार | – | हे श्यामसुंदर, संतवाणी |
No comments:
Post a Comment