या धुंद चांदण्यात तू | Ya Dhund Chandanyat Tu

या धुंद चांदण्यात तू संगती हवास
होईल रे सुखाचा तुज संगती प्रवास

नौकेमध्ये बसावे मृदु चांदणे हसावे
मी भावगीत गावे तू त्यात मोहरावे
‘मी’ ‘तू’पणा विरावा जावे सरून भास
होईल रे सुखाचा तुज संगती प्रवास

व्हावास चंद्रमा तू मी रोहिणी बनावे
त्या चंद्र-रोहिणीला चिडवूनिया हसावे
व्हावा अपूर्व अपुल्या मधुप्रीतिचा विलास
होईल रे सुखाचा तुज संगती प्रवास

वायू असा खट्याळ सांगे जगास गुज
या चांदण्या तशाच हसती त्यजून लाज
मी लाजरी लता रे आधार तूं जिवास
होईल रे सुखाचा तुज संगती प्रवास


गीतकवी सुधांशु
संगीतगजानन वाटवे
स्वर
गीत प्रकारशब्दशारदेचे चांदणे, भावगीत

No comments: