या कातरवेळी (१) | Ya Katarveli (1)

या कातरवेळी
पाहिजेस तू जवळी !

दिवस जाय बुडुन पार
ललित नभी मेघ चार
पुसट त्यास जरिकिनार
उसवि तीच सांज खुळी !

शेष तेज वलय वलय
पावे तमि सहज विलय
कसले तरि दाटे भय
येइ तूच तम उजळी !

येइ, बैस, ये समीप
अधरे हे नयन टीप
दोन ज्योती एक दीप
मंद प्रभा मग पिवळी !


गीतआशा भोसले
चित्रपटऊन पाऊस
गीत प्रकारचित्रगीत

No comments: