या मीलनी रात्र ही रंगली | Ya Milani Ratra Hi Rangali

या मीलनी रात्र ही रंगली
तू दर्पणी पाकळी चुंबिली

टिपले ओठ मी आली ही नशा
चल ये पाखरा निजल्या या दिशा
तू-मी जागे दुनिया झोपली

हळवे पाश हे विळखा रेशमी
झरले चांदणे भिजले चिंब मी
फुलले गाते प्रतिमा लाजली

विझली आग ही, विझला हा दिवा
अजुनी प्रियतमा जवळी तू हवा
हलके हलके सुषमा जागली


गीतआशा भोसले, सुधीर फडके
चित्रपटजावई विकत घेणे आहे
गीत प्रकारचित्रगीत, युगुलगीत, शब्दशारदेचे चांदणे

No comments: