वेळ झाली भर माध्यान्ह | Vel Jhali Bhar Madhyanha

वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतीच्या फुला

तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसातरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला

वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला

माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली
कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतीच्या फुला

दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनांतच सुकोनी
कसे घालू तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला

मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला


गीतउषा मंगेशकर
रागखमाज
गीत प्रकारभावगीत

No comments: