विकत घेतला श्याम | Vikat Ghetala Shyam

नाही खर्चिली कवडीदमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाइ मी विकत घेतला श्याम !

कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम !

बाळ गुराखी यमुनेवरचा
गुलाम काळा संताघरचा
हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम !

जितुके मालक तितुकी नावे
हृदये तितुकी याची गावे
कुणि न ओळखी तरीही याला दीन अनाथ अनाम !


गीत–आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट–जगाच्या पाठीवर
राग–पहाडी, मांड
गीत प्रकार–चित्रगीत, हे श्यामसुंदर, युगुलगीत

No comments: