विनायका हो सिद्धगणेशा | Vinayaka Ho Siddhaganesha

विनायका हो सिद्धगणेशा !
रंग सभेला या तुम्ही या

पक्षी गाती घरट्यांमधुनी
आशिर्वच हो द्या तुम्ही द्या

नृत्य विशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशु-तोमर
नाग कटिला बांधुन या

अपराधाला घाला पोटी
तुमच्यामाझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटीगाठी
काव्यसुधा ही प्राशुन ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या

आम्ही बालक तव गुण गायक
कृपावंत हो प्रभू गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊन या


गीत–रामदास कामत
नाटक–दार उघड बया दार
राग–ललत
गीत प्रकार–प्रथम तुला वंदितो, नमन नटवरा

No comments: