विरले गीत कसे झाली | Virale Geet Kase

विरले गीत कसे? झाली मनाची शकले
मी दिशाहीन अतां सारे सहारे मिटले !

गाइले गीत कधी फुलवीत बसंती नाते
विझले सूर अतां नयनांत खुळी आस जळे !

गहिरी याद तुझी मोहरते खोल मनी
विसरू हाय कसे ते इशारे सगळे !

नव्हता दोष तुझा शापियले मीच मला
विरल्या दाहि दिशा, दूर किनारे लपले !


गीत–महंमद रफी
गीत प्रकार–भावगीत

No comments: