विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता
वचने ही गोड गोड देशि जरी आता
दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायही विविध, विविध विषय भोवताली
गुंतता तयात कुठे वचन आठवीता
स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशही वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता
अंतरिची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊ नको नाथा
गीत | – | आशा भोसले |
राग | – | जोगकंस, मालकंस |
गीत प्रकार | – | भावगीत |
टीप – • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारणातील स्वर- सुधा मलहोत्रा. |
No comments:
Post a Comment