विषवल्ली असुनी भंवतीं
सखये तू अमृतवेल
सखये तू अमृतवेल
ग्रीष्माचा दाहक फेरा, तू त्यात मृगाची धारा
कोलाहल भंवतीं सारा, तू मंजूळ तान सुरेल
सखये तू अमृतवेल
जे जन्मांतरी वांच्छियले, जे जन्मभरीं शोधियले
तुज समीप येता सगळे ते श्रेय क्षणांत मिळेल
सखया ही अमृतवेल
विषवल्ली असुनी भंवतीं फुलुनीं ये अमृतवेल
गीत | – | अनुराधा पौडवाल, श्रीकांत पारगांवकर |
चित्रपट | – | एक डाव भूताचा |
गीत प्रकार | – | चित्रगीत, युगुलगीत |
No comments:
Post a Comment