विठुमाउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
गीत | – | जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके, सुरेश वाडकर |
चित्रपट | – | अरे संसार संसार |
गीत प्रकार | – | चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल |
No comments:
Post a Comment