ये निद्रादेवी | Ye Nidradevi

ये निद्रादेवी
तुझे सावळे हात प्रियाच्या पाठीवर ठेवी

घाव घेउनी शोककथांचे
अंगावरी वण मुक्या व्यथांचे
वत्सलतेचे लेप मुलायम तूच हळू लावी

दु:खभागल्या या डोळ्यांवर
चंदनशीतल घालुन फुंकर
थकलेल्या या दिठीस उद्याची सुखस्वप्‍ने दावी

कृष्णे तुझिया मांडीवरती
लाभू देत या लव विश्रांती
साद सुगंधित तुझा तूच या अंगाई गावी


गीत–ग. दि. माडगूळकर
संगीत–प्रभाकर जोग
स्वर–
चित्रपट–जावई माझा भला
गीत प्रकार–चित्रगीत

No comments: