ये रे घना ये रे घना | Ye Re Ghana

ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना

फुलें माझीं
अळुमाळू
वारा बघे
चुरगळूं

नको नको
म्हणतांना
गंध गेला
रानावना

टाकुनिया घरदार
नाचणार नाचणार
नको नको म्हणतांना
मनमोर भर रानां

नको नको किती म्हणू
वाजणार दूर वेणु
बोलावतो सोसाट्याचा
वारा मला रसपाना


गीत–आशा भोसले
गीत प्रकार–ऋतू बरवा, भावगीत
  टीप –
• काव्य रचना- १२ ऑगस्‍ट १९५९

No comments: