येग येग विठाबाई | Yega Yega Vithabai

येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥

भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥

इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥

माझा रंग तुझे गुणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥


गीतआशा भोसले
गीत प्रकारसंतवाणी, विठ्ठल विठ्ठल

No comments: