तुझिया स्वागता उभी समोरी, पाहुनी हसणार तू –
येणार तू, येणार तू !
येणार तू, येणार तू !
अंगणात या फुले मोगरा
तुज आवडतो ज्याचा गजरा
आठवता मी लाज लाजते, उगा तयातून येणार तू –
येणार तू, येणार तू !
साडी ल्याले आज अबोली
तुझी आठवण जागी झाली
वसंत फुलला शिशिराकाळी, मुकेपणी वदणार तू –
येणार तू, येणार तू !
दर्पणात या तुला पाहते
तुझीच प्रतिमा हृदयी ठसते
तुझ्या संगती गाली हसते, मला कधी मिळणार तू?
येणार तू, येणार तू !
गीत | – | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | – | ते माझे घर |
गीत प्रकार | – | चित्रगीत |
No comments:
Post a Comment