येणारा दिवस मला हेटाळत | Yenara Divas Mala

येणारा दिवस मला हेटाळत हसणारच !
जाणारा दिवस मला जाताना डसणारच !

वरवरच्या बोलण्यात गेली बघ सरुन रात..
मावळता चंद्र मला नाव तुझे पुसणारच !

देताना हृदय तुला केला मी हा विचार-
‘घेणारा घेणारच ! देणारा फसणारच !’

हारूनही लाखवार माझी झाली न हार,
मी माझ्या स्वप्‍नांना फिरफिरून पिसणारच !

माझे घर वार्‍याचे अन्‌ पायच पार्‍याचे
मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच !

काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक
तेव्हाही मी त्यांच्या आसवांत नसणारच !


गीतसुरेश भट
गीत प्रकारकविता

No comments: