येशिल येशिल येशिल राणी, पहाटे पहाटे येशिल?
तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशिल?
तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशिल?
ओलेती पहाट शहार्याची लाट गळ्यांत रेशमी बाहू
तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू
प्राजक्तफुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशिल?
चंद्र मावळेल वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा
कोवळ्या क्षणाचे जपून लक्षण सांगेल कोवळा वारा
भानात नसून गालांत हसून ललाट चुंबन घेशिल?
वाजता पाऊल घेईल चाहूल जाळीत चोरटा पक्षी
कोणाला दिसेना, असू दे असेना, मीलना एखादा साक्षी
धुक्याने दोघांना झाकून टाकता मुक्याने माझी तू होशिल?
गीत | – | अरुण दाते ∙ उत्तरा केळकर, रवींद्र साठे |
गीत प्रकार | – | भावगीत |
टीप – • स्वर- उत्तरा केळकर, रवीद्र साठे, चित्रपट- पोरींची धमाल बापाची कमाल (१९८७). |
No comments:
Post a Comment