येथोनि आनंदु रे | Yethoni Aanandu Re

येथोनि आनंदु रे ।
कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥

महाराजाचे राउळीं ।
वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥

लक्ष्मी चतुर्भुज जाली ।
प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥

एका जनार्दनीं नाम ।
पाहतां मिळे आत्माराम ॥४॥


गीत–सुरेश वाडकर
गीत प्रकार–संतवाणी

No comments: