येतिल कधी यदुवीर | Yetil Kadhi Yaduveer

येतिल कधी यदुवीर-सखये ।
मानस होत अधीर ॥

कटु वदले मी, रुसवा केला
म्हणुनि जिवाचा जिवलग गेला
सोडूनि हे मंदिर ॥

विरहाचा वैशाख तापला
शांत सुशीतल चंद्र न आला
कोठे धीर समीर? ॥


गीत–जयमाला शिलेदार
नाटक–सुवर्णतुला
गीत प्रकार–नमन नटवरा

No comments: