येउनी स्वप्नात माझ्या तू सख्या जाऊ नको रे
मी तुझ्या स्वप्नात येते तू कुणा सांगू नको रे
मी तुझ्या स्वप्नात येते तू कुणा सांगू नको रे
याद गहिर्या वेदनेची आज का उठते उरी
पाहुनी स्वप्नात मीलन मीच होते बावरी
धुंद झालेल्या किनारी नाव तू नेऊ नको रे
स्पर्श होता आसवांचा थरथरे का पापणी
धन्य मी झाले सख्या प्रीतीत वेड्या न्हाउनी
मी न माझी राहिले लाजून, तू पाहू नको रे
गीत | – | पुष्पा पागधरे |
गीत प्रकार | – | भावगीत, कल्पनेचा कुंचला |
No comments:
Post a Comment