या रे या सुजन | Ya Re Ya Sujan

या रे या सुजन, आपण सारेजण करूया भजन
भजन, भजन, भजन

दुरित हरण हरिचे चरण करूया स्मरण
स्मरण, स्मरण, स्मरण

ध्रुव चिलया प्रह्लादानी गाईली भक्तीची गाणी
प्रभू केला वश भजनानी
काया-वाचा-मन, जाऊ सारेजण, प्रभूला शरण
शरण, शरण, शरण

वाजवू भक्तीचा डंका, प्रभूसी मारू हाका
मग नाही यमाचा धोका
होवू या पावन, आपण सारेजण करुनी भजन
भजन, भजन, भजन


गीतपं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपटश्यामची आई
गीत प्रकारबालगीत, चित्रगीत

No comments: