या विराट गगनाखाली | Ya Virat Gagana Khali Mi

या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे
वर्षाव तुझ्या प्रेमाचा मी त्यातून भिजलो आहे

काजळी खोल डोहात, डहुळलो धुंद मोहात
वासनेत अन्‌ जळताना चांदण्यात विझलो आहे

स्वर सनई वन-वार्‍याची, वर यात्रा शत तार्‍यांची
मी प्रकाश पिउनी आता प्राणातून सजलो आहे


गीतगुरुनाथ शेणई
संगीतभानुकांत लुकतुके
स्वर
गीत प्रकारभावगीत

No comments: