याल कधी हो घरी | Yaal Kadhi Ho Ghari

याल कधी हो घरी? घरधनी, याल कधी हो घरी?
उगाच आले मन अंधारून भीती दाटली उरी

असाल कोठे कुठल्या ठायी
कुठे चालली घोर लढाई?
रक्त गोठते म्हणती तेथे बर्फाच्या डोंगरी

हे दुबळेपण मज न शोभते
सुदैवेच हे दु:ख लाभते
सात पिढ्यांनी अशीच केली देशाची चाकरी

वीरपत्‍नी मी वीरकन्यका
गिळून टाकीन व्यथा, हुंदका
नका तुम्हीही घरा आठवू, शर्थ करा संगरी


गीतआशा भोसले
चित्रपटछोटा जवान
गीत प्रकारचित्रगीत

No comments: