ए आई मला पावसात | Aai Mala Pavasat Jau

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होउ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप-खोकला-शिंका सर्दी, वाट्टेल्‌ ते होउ दे


गीत–वंदना विटणकर
संगीत–मीना खडीकर
स्वर–योगेश खडीकर
गीत प्रकार–बालगीत, ऋतू बरवा

No comments: