आईसारखे दैवत सार्‍या | Aai Sarakhe Daivat Sarya

आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई


गीतग. दि. माडगूळकर
संगीतदत्ता डावजेकर
स्वरसुमन कल्याणपूर
चित्रपटवैशाख वणवा
गीत प्रकारबालगीत, आई, चित्रगीत

No comments: