आई तुझं लेकरू | Aai Tujha Lekaru

आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता चुकलंय,
सांग मी काय करू?

या दुनियेची रीतच न्यारी
आजचा मैतर उद्यास वैरी
मतलब सरतां लाथा मारी
पाय कुणाचं धरू?

वनवासी मी एकला
आईस मुकलो गांव सोडला
मायेचा ग आधार तुटला
तळमळतंय वासरू?

तुजविण आतां कुणी न वाली
तूच बाप अन्‌ मायमाउली
दे पदराची तुझ्या सावली
तडफडतंय पाखरू


गीतराम उगांवकर
संगीतपांडुरंग दीक्षित
स्वरजयवंत कुलकर्णी
चित्रपटनवरा माझा ब्रम्‍हचारी
गीत प्रकारचित्रगीत, आई

No comments: