आई तुझी आठवण येते | Aai Tujhi Aathavan Yete

आई, तुझी आठवण येते
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळिज काजळते

वात्सल्याचा कुठे उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी नयनी दाटून येते

आई तुझ्याविण जगी एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनीची कुणास सांगू काळिज तिळतिळ तुटते

हांक मारितो ‘आई’ ‘आई’, चुके लेकरू सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली का नच कानी येते?


गीतबाळ कोल्हटकर
संगीतभालचंद्र पेंढारकर
स्वरभालचंद्र पेंढारकर
नाटकदुरितांचे तिमिर जावो
रागमांड
गीत प्रकारआई, नमन नटवरा

No comments: