आज आपुल्या प्रथम प्रीतिचा | Aaj Aapulya Pratham

आज आपुल्या प्रथम प्रीतिचा संगम हा झाला !
प्रेमफुलांच्या गळ्यात घालुनि हिंडुया माळा

नाचति झाडे, नाचति हो वेली
रानपाखरे वेडी झाली !
पृथ्वीवरती स्वर्ग धरेला भेटाया आला !

पहा कोयना इकडून येई,
समोरून ही कृष्णामाई !
प्रीतिसंगम सखे असा हा जगामध्ये पहिला !


गीतप्र. के. अत्रे
संगीतवसंत देसाई
स्वरज्योत्‍स्‍ना मोहिले, विश्वनाथ बागूल
नाटकप्रीतिसंगम
गीत प्रकारनमन नटवरा, युगुलगीत

No comments: