आज हृदय मम विशाल | Aaj Hriday Mam

आज हृदय मम विशाल झाले
त्यास पाहुनी गगन लाजले

आज माझिया किरणकरांनी
ओंजळीमधे धरली अवनी
अरुणाचे मी गंध लाविले

या विश्वाच्या कणाकणांतुन
भरुन राहिले अवघे ‘मी’पण
फुलता फुलता बीज हरपले


गीतशंकर वैद्य
संगीतपं. हृदयनाथ मंगेशकर
स्वरअरुण दाते
गीत प्रकारभावगीत

No comments: