रानपांखरा, दोन दिसांची दुनियेची दौलत
आज इथं तर उद्या तिथं !
आज इथं तर उद्या तिथं !
जेथे चारा तेथे थारा
जिथे देणगी तिथे नगारा
जाऊ तेथे निशाण रोवू ते अपुले दैवत !
मिळता खाणे गाता गाणे
जगायचे तर सुखात जगणे
गावाहुन ही बरी आपणां वार्याची संगत !
वारा नेइल तिकडे जाऊ
एकसुराने गाणी गाऊ
मिळेल तुकडा पुरे तेवढा, त्यात खरी रंगत !
गीत | – | ग. दि. माडगूळकर |
संगीत | – | सुधीर फडके |
स्वर | – | आशा भोसले |
चित्रपट | – | जशास तसे |
गीत प्रकार | – | चित्रगीत |
No comments:
Post a Comment