विठ्ठला समचरण तुझे | Vitthala Samacharan Tujhe

विठ्ठला, समचरण तुझे धरिते
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते

नेत्रकमल तव नित्‌ फुललेले
प्रेममरंदे किती भरलेले
तव गुण-गुंजी घालीत रुंजी
मानस-भ्रमरी फिरते

अरुण-चंद्र हे जिथे उगवती
प्रसन्‍न तव त्या अधरावरती
होऊन राधा माझी प्रीति
अमृतमंथन करिते

जनी लाडकी नामयाची
गुंफुन माला प्राणफुलांची
अर्पुन कंठी मुक्तीसाठी
अविरत दासी झुरते


गीतलता मंगेशकर
रागनट, भूप
गीत प्रकारविठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत

No comments: