विठ्ठला तू वेडा कुंभार | Vitthala Tu Veda Kumbhar

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार !

माती पाणी उजेड वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार !

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार !

तूच घडविसी तूच फोडिसी
कुरवाळिसि तू तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी?
देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार !


गीतसुधीर फडके
चित्रपटप्रपंच
रागतिलककामोद, देस
गीत प्रकारचित्रगीत, विठ्ठल विठ्ठल

No comments: