विठ्ठलावांचुनीं आणिकाचें ध्यान ।
नाहीं आह्मां चिंतन दुजियाचें ॥१॥
नाहीं आह्मां चिंतन दुजियाचें ॥१॥
आमुचे कुळीचें विठ्ठल दैवत ।
कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥
विठ्ठलावांचुनीं नेणों क्रियाकर्म ।
विठठलावांचुनीं धर्म दुजा नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं विठ्ठल भरला ।
भरुनीं उरला पंढरीये ॥४॥
गीत | – | संत एकनाथ |
संगीत | – | मधुकर गोळवलकर |
स्वर | – | |
गीत प्रकार | – | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
No comments:
Post a Comment